
जळगाव मिरर | १५ मे २०२५
छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या आयशरने अनेक वाहनांना कट मारल्याने वाहन चालकांनी त्याचा पाठलाग गेला. दरम्यान, अजिंठा चौफुलीवर आल्यानंतर त्याने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. दुचाकीस्वार हा त्याच्या मागील चाकाखाली आला, परंतु तो पुढे ढकलल्या गेलयामुळे सुदैवाने त्याला कुठलीही दुखापत झाली नाही. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी आयशर चालकाची चांगलीच धुलाई केली. हा प्रकार बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला.
सविस्तर वृत्त असे कि, छत्रपती संभाजीनगरकडून येत असलेल्या आयशर चालकाने रस्त्याने अनेक वाहन चालकांना कट मारला. त्यामुळे संप्त झालेल्या वाहन चालकांडून त्याचा पाठलाग सुरु होता. हा आयशर चालक शहरातील अजिंठा चौफुलीजवळ पोहचल्यानंतर तो ईच्छादेवी चौफुलीकडे जाण्यासाठी वळण घेतले. मात्र रस्त्याने जात असलेला एका दुचाकीस्वाराला वाहनाची धडक लागल्याने तो थेट दुचाकीसह आयशरच्या मागील चाकाखाली आला. हा प्रकार तेथे ड्युटीवर असलेले वाहतुक शाखेतील कर्मचारी रविंद्र कोळी यांच्यासह नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करीत वाहन थांबवले. आयशरने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार हा चाकाखाली आला, परंतु त्याला जोरात धक्का बसल्याने तो आयशरच्या दोन्ही चाकांमध्ये असलेल्या जागेत पडल्याने बालंबाल बचावले. तर त्यांची दुचाकी चाकाखाली आल्याने त्याचा पुर्णपणे चुराडा झाला. त्यानंतर देखील आयशर चालक हा तेथून भरधाव वेगाने पळून जात होता.




















