
जळगाव मिरर | १७ मे २०२५
अमळनेर शहरातील पाच कंदील भागात चोरून गांजाचे झुरके मारणे तिघांना महागात पडले असून पोलिसांनी छापा मारुन तिघांना अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पो.नि. दत्तात्रय निकम यांना १५ रोजी गोपनीय माहिती मिळाली की, गांधलीपुरा भागातील पाच कंदील चौकात काही तरुण गांजा सेवन करत असल्याची माहिती मिळाली. पो.नि. निकम यांनी हे. कॉ. चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पाच कंदील चौकात पोलिसांनी छापा टाकला असता एका भिंतीच्या आड शंकर सुपडू ढालवाले (वय ३२, रा. पालिका रुग्णालया मागे), तसेच जयसिंग बारकू पारधी (वय ६०, रा. ताडेपुरा) व हितेश सुरेश पाटील (वय २७, रा. जवखेडा, हल्ली मुक्काम तांबेपुरा) हे तिघे गांजा सेवन करताना आढळून आले. त्यांना अटक करून त्यांच्याविरोधात विविध कलमान्मवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे.कॉ. चंद्रकांत पाटील करत आहेत.




















