
जळगाव मिरर | १७ मे २०२५
घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका महिलेसह तिचे पती आणि मुलगा यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्यांच्या मालकीचे कार आणि दुचाकीचे नुकसान केली. ही घटना दि. १५ रोजी अहुजा नगरात घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील आहुजा नगरात सुवर्ण गणेश गायकवाड (वय ३४) या महिला आपल्या पती आणि मुलगा यांच्यासह वास्तव्याला आहे. गुरुवार दि. १५ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास लहान मुलांना शिवीगाळ करीत असल्याच्या जाब विचाराच्या कारणावरून सुवर्णा गायकवाड यांना शेजारी राहणारे रवींद्र सुरेश सपकाळे आणि अश्विनी रवींद्र सपकाळे यांनी शिवीगाळ करत सुवर्णा गायकवाड यांच्यासह त्यांचे पती आणि मुलगा यांना लोखंडी आसारीने बेदम मारहाण केली, तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच गायकवाड यांच्या घरासमोर असलेली त्यांची मालकीची कार आणि बुलेट गाडीवर आसाऱ्याने मारून नुकसान केले आहे.
हा प्रकार घडल्यानंतर सुवर्णा गायकवाड यांनी जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्रीच्या समारास रवींद्र सुरेश सपकाळे आणि अश्विनी रवींद्र सपकाळे दोन्ही रा. अहुजा नगर, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गुलाब माळी करत आहे.




















