
पाचोरा : जळगाव मिरर टीम
महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव यांचेकडील परिपत्रक महाराष्ट्र प्लॅस्टीक व थर्माकोल अविघटनशिल वस्तूंचे (उत्पादन, विक्री, वापर, वाहतुक, हाताळणी, साठवणूक) अधिसुचनेनूसार प्लॅस्टीक कॅरी बॅग, नॉन ओव्हन पिशव्या, वापरास बंदी घातलेली आहे. त्यानूसार पाचोरा नगरपरिषदेने “प्लॅस्टीक मुक्त पाचोरा शहर अभियानाअंतर्गत” आज दि. ५ जुलै रोजी पाचोरा शहरातील विविध प्लॅस्टीक पिशव्या (सिंगल युज) विक्री करणा-या दुकानांवर धडक मोहिम राबविण्यात आली.
नगरपरिषदेकडून शहरातील आस्थापना, दुकाने, फेरीवाले, हॉटेल्समध्ये अनाधिकृतपणे व शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टीक पिशव्या जप्त करण्याची धडक मोहिम राबवून सुमारे ४० किलो प्लास्टिक जप्त करून ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच यापुढे देखील मोहिम सुरुच राहणार असून सुचना देऊन देखील पुन्हा पुन्हा बंदी असलेल्या प्लॅस्टीक पिशव्या विक्री करणा-या दुकानदारांविरुध्द यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. प्लॅस्टीक वापराबाबत काही शंका असल्यास व्यापारी बांधवांनी नगरपरिषदेत येऊन शंका निरसन करण्याचे देखील आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी केले.
पथकात लिडिंग फायरमन राजेश कंडारे, प्रकाश लहासे, नरेश आदिवाल, विनोद सोनवणे, भिकन गायकवाड, सतीष जगताप, आकाश खैरनार, विजय ब्राह्मणे, अमोल अहिरे, बापु ब्राह्मणे, सुखदेव ठाकूर, अर्जुन सूर्यवंशी आदींचा सहभाग होता.




















