
जळगाव मिरर | २९ मे २०२५
यावल तालुक्यातील गिरडगाव येथील ५२ वर्षीय प्रौढाने विहिरीत उडी घेतली होती. नागरिकांनी प्रौढाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. ही घटना सोमवारी घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरडगाव येथील रहिवासी दिलीप उत्तम पाटील (वय ५२) यांनी गिरडगाव शिवारातील नाक्यावरील शेतातील विहिरीत उडी घेतली. हा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी धाव घेत तातडीने त्यांना विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात रवींद्र विक्रम पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक एम. जे. शेख करत आहेत.




















