• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील

डोळ्यांच्या प्रकाशासाठी पनवेलकडे १०५ रुग्णांची वाटचाल : GPS मित्र परिवाराचा उपक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 31, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, व्यवसाय, सरकारी योजना, सामाजिक
0
नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | ३१ मे २०२५

“रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे” या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून समाजातील गरजू नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेच्या उपक्रमाचे आयोजन करताना मला खऱ्या अर्थाने आत्मिक समाधान मिळते. कुणाच्यातरी जीवनात प्रकाश पेरण्याचा हा खरा दिव्य अनुभव आहे. गरिबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला पुढे काम करण्याची नवी ऊर्जा मिळते. जनतेच्या सेवेसाठी मी कायम तत्पर राहीन, असे स्पष्ट प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाळधी येथे GPS मित्र परिवार आणि भाऊसो गुलाबरावजी पाटील फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर आयोजित केले होते. त्या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या वेळी त्यांच्या उपस्थितीत पनवेल येथील आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल येथे डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी १०५ पात्र रुग्णांना सन्मानपूर्वक रवाना करण्यात आले. या उपक्रमात पनवेल येथील डॉ. सुदेश पाटील, डॉ. सुजय कोल्हापुरे , डॉ.अर्पिता जाधव, डॉ.प्रिया साळवी , चंदन चौधरी, प्रकाश पाटील आणि राहुल चौधरी यांच्या तज्ज्ञ टीमने ३०५ रुग्णांची तपासणी केली. त्यात १०५ रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. या रुग्णांना लक्झरी आणि चारचाकी वाहनांतून पनवेल येथे रवाना करण्यात आले असून, पुढील दोन दिवसांत आधुनिक पद्धतीने त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन होणार आहे. या शिबिराचे आयोजन मा. जि.प. सदस्य प्रतापराव पाटील , विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली GPS ग्रुप व भाऊसो गुलाबरावजी पाटील फौंडेशन मार्फत करण्यात आले. रुग्णांच्या राहण्याची, जेवणाची व औषधोपचारांची संपूर्ण जबाबदारी GPS मित्र परिवाराने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली आहे. हे कार्य केवळ सामाजिक नव्हे, तर मानवी मूल्यांची जपणूक करणारे आहे.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी GPS ग्रुपच्या सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले व त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रतापरव पाटील, सरपंच विजय पाटील, धनराज कासट, चंदन कळमकर, संजय महाजन, प्रशांत झवर, दिनेश कडूसे, अनिल माळी, दिलीप माळी, आबा माळी, नारायण आप्पा सोनवणे, बळीराम सपकाळे, मच्छिंद्र कोळी, प्रशांत पाटील, अरुण पाटील, अमोल पाटील, तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

दरवर्षी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली २ ते ३ वेळा अशा नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करून शेकडो गरजूंना जीवनात नवा प्रकाश देणारे हे कार्य, जनतेच्या सेवेसाठी निःस्वार्थपणे झटणाऱ्या नेतृत्वाचे उदाहरण ठरते. या उपक्रमातून समाजात माणुसकी, दया आणि करुणेची नवी ऊर्जा पसरते. याचा जिवंत अनुभव आज पाळधीच्या भूमीत सर्वांनी घेतला

Related Posts

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
क्राईम

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !
क्राईम

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group