
जळगाव मिरर | ३ जून २०२५
जळगाव जिल्ह्यातील १४ पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहे. त्यामध्ये त्यामध्ये वर्षभरापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे बबन आव्हाड यांची पुन्हा एमआयडीसीमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांना नुकतेच गाजलेले ड्रग्ज व गुटखा प्रकरण भोवल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे. तर एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेत बदली केली आहे.
बदली अशी अधिकारी नेमणूक- नवीन पोलीस ठाणे बबन आव्हाड एलसीबी — एमआयडीसी निरीक्षक संदीप पाटील -एमआयडीसी- एलसीबी कावेरी कमलाकर -चोपडा ग्रामीण- शनी पेठ दत्तात्रय निकम अमळनेर- अमळनेर रंगनाथ धारबळे शनिपेठ – यावल प्रदीप ठाकूर यावल जिल्हा पेठ – सुनील पवार – पारोळा नियंत्रण कक्ष सोपनि प्रमोद कठोरे आर्थिक गुन्हे शाखा पहूर -सोपनि जनार्दन खंडेराव वरणगाव यावल सपोनि अमितकुमार बागुल भुसावळ बाजारपेठ – वरणगाव सपोनि प्रकाश काळे पिंपळगाव -हरेश्वर जळगाव शहर सापोनि कल्याणी वर्मा – जळगाव शहर पिंपळगाव हरेश्वर पोउनि सोपान गोरे पाचोरा – एलसीबी.
एलसीबीतील पोलिस निरीक्षकाचे ड्रग्ज पेडलर सोबत संबध असल्याचा प्रकार उघडकीस आले होते. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधिक्षकांनी दिले होते. तसेच एलसीबीतील कर्मचाऱ्यांचा गुटख्याचे पैशे घेण्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. या घटनेमुळे एलएसीबी कंलकीत झाली होती. त्यामुळेच एलसीबीचे पोनि. बबन आव्हाड यांना हे प्रकरण भोवले असल्याची चर्चा सुरू आहे.




















