
जळगाव मिरर | ४ जून २०२५
गेल्या काही महिन्यापासून जळगाव शहरातील नवीन बस स्थानक परिसरातून नेहमीच सोनसाखळी व रोकड लांबविण्याच्या घटना घडत असतांना आता पुन्हा एकदा बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा काशिनाथ गणपत डोंगरे (वय ७९, रा. टाकरखेडा, ता. जामनेर) यांच्या खिशातून ५० हजारांची रोकड चोरुन नेली. ही घटना दि. २ रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास नीवन बस स्थानक परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे काशिनाथ गणपत डोंगरे (वय ७९) हे वृद्ध वास्तव्यास असून ते टेलरींग काम करतात. दि. २ जून रोजी दुपारच्या सुमारास नवीन बस स्थानक येथे आले. फलाटावर लागलेल्या जळगाव ते जामनेर बसमध्ये ते चढण्यासाठी गेले. यावेळी गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढत असतांना काशिनाथ डोंगरे यांच्या खिशातून चोरट्यांनी ५० हजारांची रोकड चोरुन नेली. बसमध्ये चढल्यानंतर डोंगरे यांना खिशात पैसे मिळून आले नाही. त्यांनी संपुर्ण परिसरात पैशांचा शोध घेतला, मात्र तरी देखील पैसे मिळून न आल्याने अखेर त्यांनी जिल्हापेठ पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















