
जळगाव मिरर | ६ जून २०२५
अमळनेर शहरात मंगलमूर्ती चौकात दि.१६ मे रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास नातेवाईकसोबत का फिरतो या कारणावरून तिघांनी एकाला मारहाण करून त्याच्या खिश्यातील एक हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मंगलमूर्ती चौकात अक्षय अनिल सोनवणे (रा जुना पारधीवाडा सुभाष चौक) हा दि १६ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास उभा असताना कार्तिक पवार, मुकेश पवार तसेच सुपडी चव्हाण हे तिघे आले व त्यांनी त्यांचा नातेवाईक रोनक याच्यासोबत का राहतो या कारणावरून चापट बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व त्याच्या खिश्यातील एक हजार रुपये काढून घेतले. त्यांनतर अक्षय संत सखाराम महाराज यात्रेत गेला व तेथेच झोपून राहिला. दुसऱ्या दिवशी सक ाळी झोपेतून उठून पाहिले असता त्याच्या खिश्यातील मोबाईल गायब होता.
तो पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला येत असताना श्रीराम चौकात कार्तिक उभा होतात्याने हातपाय मोडण्याची धमकी देवून कोणत्यातरी वस्तूने त्याच्या हातावर मारहाण केली. अक्षय ला दुखापत झाल्याने त्याला अमळनेर धुळे व परत धुळे असे वेगवेगळ्या दवाखाण्यात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारास विलंब झाल्याने उशिराने अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.





















