जळगाव मिरर | २० जून २०२५
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेल रोडवर दलवाडे फाट्याजवळ जळगाव – नंदुरबार बस व ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची घटना दि.१९ रोजी दुपारी अडीच वाजता घडली. अपघातात बसमधील ९ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना धुळे येथे पाठवण्यात आले आहे. किरकोळ जखमी १२ प्रवाशांवर शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जळगाव येथून नंदुरबारकडे जात असलेली नंदुरबार आगाराची एमएच २० बीएल ४०२५ क्रमांकाच्या बसची समोरून येणाऱ्या एमएच १८ बीझेड ६६१८ क्रमांकाच्या ट्रकशी गुरुवारी दुपारी अडीच वाजता दलवाडे फाट्याजवळ धडक झाली. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
किरकोळ जखमींमध्ये सुरेखा भरत सिंग गिरासे (वय ४७, रा. मेथी), माधुरी प्रशांत चांदेकर बसवाहक (वय ३४, रा. नंदुरबार), सुमनबाई सुका पाटील (वय ७०, रा. शनिमांडळ), गंगाबाई चंद्रसिंग गिरासे (वय ८१, रा. चिलाणे), सखुबाई दशरथ वडर (वय ५०, रा. डांगरी), हिरामण उघडू भिल वय ५३, रा. चिलाणे), राहुल अर्जुन भिल (वय २ वर्षे, रा. चिलाने), सायाबाई अर्जुन भिल (वय २५, रा. चिलाणे), गौरी राजेंद्र शिवदे (वय १३, रा. चिलाणे), खटाबाई पाटील (वय ६८, रा. धमाणे), ललित राजेंद्र शिवदे (वय ११, रा. चिलाणे) यांचा समावेश आहे. यांच्यावर शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, ट्रकमालक पारोळा येथील असून ट्रक गुजरातकडून येत होता. ट्रकमध्ये जिरे भरलेले होते.
गंभीर जखमींमध्ये धुडकू राजाराम भिल (वय ६५, रा. मेथी), सुभाष सोपानराव पासकरे (वय ४०, रा. नांदेड) बसचालक, देवचंद गंगाराम ठाकूर (वय ६६, रा. दलवाडे), मीना राजेंद्र शिवदे (वय ३०, रा. चिलाणे), दिलीप अमर नगराळे (वय ७०, रा. दोंडाईचा), संजू भिका तमखाने (वय ५०, रा. दोंडाईचा), दशरथ वडार (वय ६०, रा. डांगरी), ट्रक चालक बाबूराव धुडकू पाटील, रा. मंदाने यांचा समावेश असून त्यांना अधिक उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले आहे.
