जळगाव मिरर | २ जुलै २०२५
राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली व दिल्ली पर्यटन व परिवहन विकास निगम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंग अम्लान’ या बालनाट्य महोत्सव व अभिनय कार्यशाळा 2025 चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.यासाठी संपूर्ण भारतातून 850 विद्यार्थ्यांनी एप्लीकेशन केले होते. पण त्यातून फक्त उत्तम बालकलाकार 250 एप्लीकेशन स्वीकारण्यात आले. व दिनांक 19 जून रोजी राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली येथे प्रत्यक्ष बालकलाकारांची ज्येष्ठ रंगकर्मी रोहित त्रिपाठी, राजीव गौरसिंह,लोकेंद्र त्रिवेदी,अविनाश देशपांडे,वीरेंद्र कुमार, व राष्ट्रीय विद्यालयाचे माजी विद्यार्थी पार्थ हजारिका,बिनोद महाकुर,विजय राजवंशी,पुनीत नंदा,कुणाल भांगे यांच्या निवड समितीने 150 विद्यार्थ्यांची कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली.
यात श्री स्वामी समर्थ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ भादली खु. संचलित श्री संत सोमगिर माध्यमिक विद्यालय भिलाली ता.पारोळा जि.जळगाव येथील पूर्व विशाल जाधव या विद्यार्थिनीची पुढील 20 जून ते 30 जून पर्यंत होणाऱ्या बालनाट्य महोत्सव व अभिनय कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली. कार्यशाळेच्या दहा दिवसात पूर्वा जाधवने आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली व शेवटच्या दिवशी ‘फंटुस चिल्लर’ या बालनाट्यात प्रमुख भूमिका बजावली आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्लीचे निदेशक चितरंजन त्रिपाठी यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
पूर्वा जाधव या विद्यार्थिनीने या अगोदर अंतर शालेय विज्ञानाचे महोत्सव सांस्कृतिक संचालनालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या बालनाट्य स्पर्धा राज्य नाट्य स्पर्धा एकांकिका स्पर्धा यात अनेक बक्षिसे मिळविली आहेत. पूर्वाचे वडील रंगकर्मी विशाल जाधव व काका अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनाने पूर्वाची सांस्कृतिक क्षेत्रात घोडदौड सुरू आहे. पूर्वाची दिल्लीला निवड झाल्याबद्दल शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष श्री मनोज पाटील सर व शाळेचे मुख्याध्यापक अविनाश पाटील सर शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
