जळगाव मिरर | १३ जुलै २०२५
अमळगाव ते जळोद रस्त्यावर दि.१२ रोजी सकाळी शेतमजुरांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाला चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण गंभीर तर २० जण जखमी झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील बुधगाव येथून रिक्षा (एमएच- १९, बीजे- ४३६५) मध्ये सुमारे १६ शेतमजूर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अमळगावकडे येत होते. त्याचवेळी अमळगावकडून जळोदकडे जाणाऱ्या चारचाकी (एमएच- १९, सीझेड- २५२२) ने या रिक्षास जबर धडक दिली. चारचाकी चालक पवन तुकाराम बाविस्कर याने रिक्षाला जबर धडक दिल्याने रिक्षातील काही प्रवासी रस्त्यावर फेकले गेले होते. तर काही जण रिक्षातच अडकले होते. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच पो.नि. दत्तात्रय निकम, पो.उ.नि. भगवान शिरसाठ, हे. कॉ. संदेश पाटील, राहुल पाटील, योगेश बागुल यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारार्थ रवाना करुन पंचनामा केला. या अपघातात रिक्षात बसलेले बुधगाव येथील विकास भिला कोळी (वय ३५), सचिन कैलास शिरसाठ (वय २२), उमेश कैलास शिरसाठ (वय १९), रघुनाथ साहेबराव शिरसाठ (वय ५५), वैशाली रवींद्र कोळी (वय २७), नंदा विकास कोळी (वय २८), मुक्ताई लीलाधर भोई (वय १७), संगीता बळीराम कोळी (वय ३५), कल्पना रघुनाथ कोळी (वय ४७), तसेच रिक्षाचालक योगेश भिका कोळी (वय ३१) हे जखमी झाले आहेत.
सर्व जखमींना अमळनेरच्या श्री अॅक्सीडन्ट हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर प्रतिभा कैलास कोळी व कैलास नवल कोळी या जखमींना धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. तर सुवर्णा विलास कोळी (वय ३५) व प्रांजल विलास कोळी (वय १६) यांना अमळनेरातील मोरया हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. याचारचाकीचा चालक पवन तुकाराम बाविस्कर शीतल पवन बाविस्कर, मीराबाई बाविस्कर तसेच अशोका (१३ महिने सोच प्रांतल कोळी (वय ३) या बालकांना मुळे येथील देवरे हॉस्पिटलमध्ये याखल केले आहे. तर रेखाबाई भरत शिरसाठ (वय ४५), सुंदवाई उत्तम को (वय ५३), जनाबाई निया साळुंखे (वग ७५) यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
