जळगाव मिरर | १४ जुलै २०२५
रावेर येथील यावल वन्यजीव पाल वनक्षेत्रपाल शितल नगराळे नुकत्याच रुजू झाल्या. त्यांनी पदभार घेतल्याबरोबर दि. १२ रोजी गुप्त बातमीवरुन यावल अभयारण्यातील पाल वन्यजीव वनपरिक्षेत्रातील सुकी नदी येथे अवैधरित्या उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले. आरोपी शब्बीर बलदार तडवी यास अटक करुन ट्रॅक्टर (एमएच-१९ जि बी ६९३०) वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह जप्त केले. मुद्देमालासह एकूण नुकसानीची रक्कम २ लाख आहे.
ही कार्यवाही उपवनसंरक्षक (वन्यजीव) कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक सत्यजीत निकत व मंगेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, वनपाल संभाजी सुर्यवंशी, प्रविण पाटील, वनरक्षक रोहिदास पाटील, जगदिश बारेला, संजय बारेला, रणधीर काटे, राजमल बारेला, सविता बारेला, सकिना तडवी, धनाबाई मादले, वनमजुर परमान तडवी, युसूफ खान यांनी केली. वनविभागाच्या वतीने वाळू माफियांवर कारवाई केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
