• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

डिसले गुरुजींकडून तब्बल ३४ महिन्यांचा पगार होणार वसूल ; राजीनामा दिला पण कारवाई अटळ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 13, 2022
in राज्य, सामाजिक
0
डिसले गुरुजींकडून तब्बल ३४ महिन्यांचा पगार होणार वसूल ; राजीनामा दिला पण कारवाई अटळ
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : वृत्तसंस्था

माढा तालुक्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत नियुक्तीस असलेले डिसले गुरुजी राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ग्लोबल पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी नुकतीच राजीनामा पूर्व नोटीस दिली आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले गुरुजींबाबत चौकशी करून अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार कारवाई होण्याअगोदर रणजितसिंह डिसले यांनी 7 जुलै रोजी राजीनामा नोटीस दिली आहे. 8 ऑगस्ट रोजी त्यांचा राजीनामा मंजूर होऊन त्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे. तरीही जिल्हा प्रशासन डिसले गुरुजींवर कारवाई करणार आहे. जवळपास चौतीस महिने कामावर हजर न राहता त्यांनी पगार घेतला आहे. हा सर्व पगार सोलापूर जिल्हा प्रशासन वसूल करणार आहे. याबाबत जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी माहिती दिली.

डायटकडे प्रतिनियुक्तीवर असताना ३४ महिने गैरहजर राहिल्याने त्यांनी या काळात उचलेला पगार वसूल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली. सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले उपशिक्षक रणजितसिंह डिसले यांनी 2017 ते 2020 या कालावधीत काय केले? याबाबत सखोल चौकशी झाली आहे. याबाबत एक फाईल तयार करण्यात आली आहे. हा चौकशी अहवाल जिल्हापरिषद सीईओंकडे गोपनियरित्या सादर करण्यात आला आहे.
ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांना पीएचडी करण्यासाठी अमेरिकेतील फुल ब्राईट संस्थेने शिष्यवृत्ती मंजूर केली होती. त्यानुसार ऑगस्टमध्ये पी. एचडी करण्यासाठी डिसले गुरुजी अमेरिकेला जाणार होते. त्यासाठी परवानगी मागण्यासाठी जानेवारी महिन्यात ते जिल्हा परिषदेत आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना भेटण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी शिक्षणाधिकारी लोहार यांनी रजा मंजुरीची नियमावली सांगितली होती.

रजेचा अर्ज गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे द्या, तेथून तो माझ्याकडे येईल, असे न करता थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांच्याकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे नियमात बसत नाही, असे कारण समोर केले. तसेच पीएचडी कोणत्या विद्यापीठात करणार आहे, पीएचडी करण्यासाठी अमेरिकन विद्यापीठाने दिलेली परवानगी सर्व माहिती सादर करा, मग रजेचा अर्ज मंजूर केला जाईल, असे सांगितले होते. गट शिक्षणाधिकाऱ्याकडे रजेसाठी सर्व कागदपत्रासह अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

रजेच्या प्रकरणानंतर डिसले गुरुजींनी मिळवलेली पदवी व त्यानंतर तीन वर्षे जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे प्रतिनियुक्तीवर असताना केलेल्या कामाबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. तत्कालीन शिक्षणअधिकारी संजय राठोड यांनी यापूर्वीच चौकशी करून अहवाल तयार केला होता. त्याबद्दल सर्व चौकशी करून विद्यमान शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी अहवाल तयार केला आणि जिल्हा परिषद सीईओ यांकडे सादर केला. कारवाई होण्याअगोदर राजीनामा नोटीस दिल्याने कारवाई थांबणार नाही, त्यांना दिलेला सर्व पगार शासन वसूल करणार असल्याची माहिती यावेळी दिली.

Related Posts

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !
जळगाव

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा
जळगाव

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !
जळगाव

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा
जळगाव

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026
शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन
जळगाव

शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन

July 17, 2026
रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन
जळगाव

रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन

July 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group