जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२५
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीविषयी मोठी बातमी समोर आली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग पाचव्या महिन्यात घसरण झाली असून सरासरी ३४ रुपयांची कपात झाली आहे. मार्चपासून आतापर्यंत एकूण १७० रुपयांची घसरण झाली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे जागतिक बाजारात नैसर्गिक गॅसच्या किमतीत मोठी घट झाली आहे.
IOCL च्या आकडेवारीनुसार, देशाच्या चारही प्रमुख मेट्रो शहरांमध्ये व्यावसायिक गॅसच्या दरात घसरण झाली आहे:
- दिल्ली : 33.50 रुपयांची कपात, नवीन दर – ₹1631.50
- मुंबई : 34 रुपयांची कपात, नवीन दर – ₹1582.50
- कोलकाता : 34.50 रुपयांची कपात, नवीन दर – ₹1734.50
- चेन्नई : 34.50 रुपयांची कपात, नवीन दर – ₹1789.00
दुर्दैवाने, सामान्य घरगुती वापरकर्त्यांसाठी मात्र कोणताही दिलासा मिळालेला नाही. एप्रिल महिन्यात ५० रुपयांची दरवाढ झाल्यानंतर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती जैसेच्या तसेच आहेत:
- दिल्ली – ₹853
- मुंबई – ₹852.50
- कोलकाता – ₹879
- चेन्नई – ₹868.50
सरकारने ८ एप्रिल रोजी घरगुती गॅसच्या दरवाढीची घोषणा केली होती आणि त्यानंतर आजवर कोणताही बदल झालेला नाही.
