जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२५
पारोळा तालुक्यातील शेळावे बु येथे साहित्यिक साहित्यरत्न, थोर समाजसुधारक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत शेळावे बु. येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात भीम आर्मी तालुका पारोळा अध्यक्ष एकनाथ पवार, भीम आर्मी तालुका उपाध्यक्ष प्रविण मिठाराम पारधी, विनोद बाळु पाटील, बबलू पाटील, शुभम वाघ, बजरंग दल उपाध्यक्ष वैभव राजपूत, धनराज भाऊ, निकम रामकृष्ण पवार, आनंदा बिह्मडे, अनिल निकम, सुनील निकम, कल्पेश सोनवणे, भैय्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला. त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा आढावा घेत नव्या पिढीने त्यांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
