
जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२५
अमळनेर तालुक्यातील एका गावात खड्डा खोदण्यावरून भांडण झाल्याने महिलेचा विनयभंग करून दोघांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे सासरे सोसायटीचे डायरेक्टर असून २ रोजी सोसायटीच्या जागेच्या बाजूला खड्डे खोदणाऱ्या देवराम बाबुराव कोळी, सागर देवराम कोळी, अशोक बाबुराव कोळी यांना मज्जाव केला असता त्यांनी महिलेच्या सासऱ्याला शिवीगाळ व मारहाण केली. गावातील लोकांनी ते भांडण मिटविले. त्याच रात्री गावात तमाशाचा कार्यक्रम असल्याने महिलेचे पती तमाशा पाहायला गेले होते. रात्री ९:३० वाजता महिला घरी एकटी असताना सागर देवराम कोळी हा घरात घुसून आला. महिलेने घाबरून आरडाओरड केल्याने तिची सासू घरात आल्याने सागर कोळी पळून गेला. त्यानंतर पती जाब विचारण्यासाठी सागर कोळीकडे गेले असता देवराम कोळी, सागर कोळी, अशोक कोळी यांनी महिलेच्या पतीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.




















