
जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२५
नोकरीच्या मागे न धावता युवकांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योग व्यवसायाकडे वळावे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केले
बदलापूर मधील गुप्ते म्हसकर सभागृहात नाभिक समाज उन्नती मंडळ बदलापूर ने आयोजित केलेल्या “संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा” व वार्षिक स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून अनिल बोरनारे बोलत होते यावेळी बदलापूरचे माजी उपनगराध्यक्ष राजन घोरपडे शिवसेना शहर प्रमुख किशोर पाटील महिला आघाडी शहर संपर्क प्रमुख वर्षा चव्हाण नाभिक समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष विजय निंबाळकर सचिव नितीन नेरपगार खजिनदार दिलीपकुमार खोंडे उपाध्यक्ष लालचंद सूर्यवंशी रमेश महाले यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बदलापूर मधील पाचशेहून अधिक नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य व केंद्र शासन स्टार्ट अप इंडिया च्या माध्यमातून उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात मदत करत असून युवकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर बनण्याचा सल्ला देखील यावेळी बोरनारे यांनी दिला
बदलापूर मधील नाभिक समाजातील इयत्ता पहिली ते दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाजातील शासकीय कर्मचारी व अधिकारी यांची पदोन्नती आणि ज्येष्ठ नागरिकांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला




















