
जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२५
अमळनेर शहरातील शिरूड नाका परिसरातील ३६ खोली भागात ३१ ऑगस्ट रोजी रात्री मुलाने पित्याच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आरोपी मुलास अटक झाली आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याने दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची माहिती मृताचे नाव राजेंद्र दत्तात्रय रासने (६५), तर आरोपीचे नाव भूषण राजेंद्र रासने (३६) असे आहे.
रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान भूषणने वडील राजेंद्र यांना खर्चासाठी पैसे मागितले होते. ते न दिल्याने झालेल्या वादातून आरोपीने दारूच्या नशेत हा खून केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न राजेंद्र रासने गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळावरून रक्ताने माखलेली हातोडी जप्त करण्यात आली आहे. आरोपी भूषण रासने याला पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली आहे. २ रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी शरद काकळीज यांनी दिली.




















