
जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२५
दिनांक 2 सप्टेंबर 2025 (मंगळवार) रोजी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम विभाग आणि सेमी विभागांतर्फे मध्ये सात दिवसीय पार्थिव गणेश स्थापना करण्यात आली होती. गणेशाचे आज विसर्जन करण्यात आले. शेवट च्या दिवसाची सांगता करताना सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली होती ती पूजा शाळेचे प्राचार्य माननीय श्री संतोष चौधरी सर व त्यांच्या पत्नी सौ.वर्षा चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाली. बाप्पा आपल्या गावाला जाणार या विचाराने संपूर्ण वातावरण उदास होते.
गणेश विसर्जन सोहळ्याला शालेय प्रशासन अधिकारी श्री दिनेश ठाकरे सर सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री किरण सोहळे सर आणि माध्यमिक विभागाचे प्राचार्य श्री संतोष चौधरी सर, प्राथमिक विभागाच्या प्राचार्या सौ योगिता शिंपी दीदी, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्राचार्या सौ सविता कुलकर्णी दीदी, सेमी विभागाचे प्राचार्य श्री हेमराज पाटील सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना इको फ्रेंडली गणपती चे महत्व सांगण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात पार्थिव गणेशाची मूर्ती विसर्जित करण्यात आली. संपूर्ण आसमंत गणपती बाप्पा मोरया या शब्दांनी गुणगुणत होता.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख करिष्मा पाठक माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ हर्षदा उपासनी दीदी यांनी चारही विभागांचे प्राचार्यांच्या मार्गदर्शनात नियोजन केले. आयोजित गणेश विसर्जनाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले





















