
जळगाव मिरर | ३ सप्टेंबर २०२५
उसनवारीच्या पैशांवरुन गजानन राजाराम रायते (वय २६, रा. रामेश्वर कॉलनी) याच्यासह त्याच्या मित्राला बोलावून घेत चौघांनी बेदम मारहाण केली. ही घटना दि. ३१ रोजी काशिनाथ चौकात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारा गजानन रायते याचे उसनवारीच्या पैशांवरुन वाद होते. दि. ३१ रोजी रात्री साडेनऊ वाजता शुभम पाटील याने त्याला काशिनाथ चौकाजवळ बोलावले होते. त्यावेळी गजानन रायते हा त्याचा मित्र शेखर तरटे च्यासोबत काशिनाथ चौकात गेला होता. त्यावेळी शुभम पाटील याने त्याचे साथीदार सनी जाधव, दिनेश चोधरी, अपप्या उर्फ आकाश मराठे यांना बोलावून घेतले. गजाननचा मित्र बोलत असतांना सनी जाधव याने त्याच्या तोंडावर थाप मारुन तू मध्ये बोलू नको असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांना मेहरुण परिसरातील अशोक किरणाजवळ बोलावून घेतले. बोलत असतांना सनी जाधव याने त्याच्या तोंडावर थाप मारुन तू मध्ये बोलू नको असे म्हणत शिवीगाळ केली.
त्यानंतर दोघांना मेहरुण परिसरातील अशोक दोघ तरुण त्याठिकाणी गेले असता, चौघांनी ता लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत शुभम पाटील याने शेखर तरटे याला लाकडी दांडक्याने मारुन गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करीत आपली खून्नस कायम राहील अशी धमकी देखील दिली. याप्रकरणी शुभम विजय पाटील, सनी जाधव, दिनेश चौधरी, अप्प्या उर्फ आकाश मराठे (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकॉ किरण चौधरी हे करीत आहे.




















