• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

ज्ञानाच्या प्रवाहाला हवी संस्कारांसह मूल्यांची जोड

गणेशोत्सव स्पर्धा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 3, 2025
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
ज्ञानाच्या प्रवाहाला हवी संस्कारांसह मूल्यांची जोड
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ सप्टेंबर २०२५

आजच्या युगात तंत्रज्ञान जितके महत्त्वाचे आहे तितकेच मानवी मूल्ये, संस्कृती, सामाजिक जाणीव आणि सर्जनशीलता हे देखील आवश्यक आहेत. फक्त तांत्रिक ज्ञान घेणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट राहिलेले नाही, तर तंत्रज्ञानाचा योग्य वापर करताना संस्कार आणि मूल्यांची कास धरून सर्वांगीण प्रगती साधणे महत्त्वाचे आहे. ज्ञानाच्या अथांग प्रवाहात मानवी मूल्ये आणि संस्कारांची जोड आवश्यक आहे. तेव्हाच आनंदी जीवन जगता येईल, असे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.

यावल तालुक्यातील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सव स्पर्धा आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. जगदीश पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी तर प्रमुख अतिथी ज्येष्ठ संचालक लीलाधर चौधरी, संचालक मधुकर परतणे, पर्यवेक्षक आर.एस. जावळे, ज्येष्ठ शिक्षक बी.एन‌. पाटील, उत्सव समिती प्रमुख एस.एम. तायडे, एम.एस. जाधव उपस्थित होते. प्रास्तविक बी.एन. पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्रीमती पल्लवी पाटील यांनी केला.

शाळेत विविध दात्यांनी ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर मिळणाऱ्या वार्षिक व्याजातून दरवर्षाप्रमाणे यंदाही वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. पाचवी ते बारावीपर्यंत शालेय परीक्षांमध्ये आणि प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे वाटप करण्यात आली. दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम, द्वितीय तसेच विविध विषयात प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा बक्षिसे वाटप करण्यात आली.

तसेच गणेशोत्सवात हस्ताक्षर, रांगोळी, चित्रकला, हस्तकला, विज्ञान तक्ते व मॉडेल, भावगीत, प्रश्नमंजुषा, स्मरणशक्ती, स्लो सायकलींग, गोणपाट उड्या, लिंबूचमचा शर्यत, उलट चालणे, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांसोबतच फन फेअर हा मनोरंजनाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला. या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या.

विद्यार्थी भविष्याचा वेध या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, मोबाईल, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा तंत्रसाधनांचा वेगाने वापर होत आहे. विद्यार्थ्यांनी याचा सकारात्मक उपयोग करून नवे ज्ञान मिळवावे, स्पर्धात्मक जगात टिकून राहावे, तंत्रज्ञानाची गाडी वेगाने धावत असताना, तिच्यासोबत संस्कारांची दिशा आणि सर्जनशीलतेचे पंख मिळाले तरच शिक्षणाचा खरा उद्देश साध्य होईल. हेच नवीन शैक्षणिक धोरणात देखील अपेक्षित आहे. म्हणून तंत्रज्ञान स्वीकारा, सोबतच मानवी मूल्ये जपा, असा संदेशच डॉ. जगदीश पाटील यांनी दिला.

अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शाळेतील व्यासपीठाचा जीवनाच्या विकासासाठी परिपूर्णपणे वापर करून घ्यावा, आजच्या मेहनतीतच उद्याचे सुकर भविष्य लपले आहे, म्हणून भावी आयुष्यासाठी मेहनत केली पाहिजे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन जी.एस. पाटील सर यांनी तर आभार उत्सव समिती प्रमुख एस.एम. तायडे यांनी मानले. ध्वनीक्षेपण यंत्रणा एन.जी. चौधरी यांनी तर बैठक व्यवस्था डी.बी. सरोदे, पी.एम. वानखेडे यांनी केली. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group