
जळगाव मिरर | ५ सप्टेंबर २०२५
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. घराच्या ओट्यावरील खाटेवर झोपलेल्या ८२ वर्षीय वृद्ध महिलेवर ३० वर्षीय राहुल केदार या तरुणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले असून त्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात वृद्ध महिला २ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता घराच्या पोर्चमध्ये ठेवलेल्या खाटेवर झोपली होती. मध्यरात्री साडेतीन वाजता अचानक राहुल बापू केदार याने त्यांना मिठी मारून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तर वृद्ध महिलेने आरडाओरडा केल्यावर तिचा मुलगा, सून आणि नातू बाहेर आले. त्यांनी महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. तर मुलगा व कुटुंबीयांनी काठ्यांनी मारून महिलेला त्याच्या तावडीतून सोडवले. या घटनेनंतर राहुल बापू केदार पळून गेला. या प्रकरणी पीडित वृद्ध महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात राहूल केदार याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















