जळगाव मिरर | ७ सप्टेंबर २०२५
जळगाव शहराच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त असा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव राबवित आहे. गणेश विसर्जनानंतर ७ सप्टेंबर २०२५ रविवार रोजी सकाळी “स्वच्छ भारत – सुंदर भारत” या संकल्पनेतून शिवतीर्थ मैदान ते सुभाष चौक या मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव संस्थेच्या शाळा व महाविद्यालय यामधील सुमारे १५०० विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले असून, मार्गावरील कचरा त्याची योग्य विल्हेवाट लावली. विशेष म्हणजे, पर्यावरण संरक्षणाचा विचार करून व्यवस्थापन करण्यात आले.
या स्वच्छता उपक्रमात काशीनाथ पलोड पब्लिक स्कूल (C.B.S.E.), ब. गो. शानभाग विद्यालय, इंग्लिश मिडियम स्कूल, प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा (वाघनगर), विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ महाविद्यालय, श्रवण विकास, डॉ. अविनाश आचार्य विद्यालय या शैक्षणिक विभागांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
अभियानाचा समारोप शिवतीर्थ मैदानावर झाला.या कार्यक्रमाच्या समारोपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.भरतदादा अमळकर , उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जीवनामध्ये स्वच्छतेचे असलेले महत्त्व आणि ते आपल्या अंगी कसे रुजवावे याविषयी मार्गदर्शन केले. आज जो उपक्रम राबविण्यात आलेला आहे .ते केवळ स्वच्छता अभियान नसून हा एक श्रम संस्कार आहे जो विद्यार्थ्यांनी आयुष्यभर अंगीकारावा .या उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत विवेकानंद प्रतिष्ठान व केशवस्मृती परिवाराचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील सहभागी झाले.