जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२५
राज्यातील महायुती सरकारसाठी लाडकी बहिण योजना महत्वाची ठरली होती आता याच लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांसाठी आता अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला असून, या निर्णयाची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. आता महिलांना ई केवायसी करावे लागणार आहे. ही प्रोसेस केली नाही तर योजनेची रक्कम खात्यात वर्ग केली जाणार नाही, असं सांगण्यात आलं आहे.
लाडकी बहीण योजनेत दरवर्षी आता महिलांची ई केवायसी केली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या प्रोसेससाठी दोन महिलांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर ई केवासीची प्रोसेस करण्याचं आवाहन मंत्री अदिती तडकरे यांनी केलं आहे. पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असं त्यांनी एक्सवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अदिती तटकरे यांची एक्स पोस्ट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे, असं अदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कशी करायची ईकेवायसी प्रोसेस ?
ई-केवासी याचा अर्थ म्हणजे Know Your Customer. याचाच अर्थ असा की तुमच्या लाभार्थ्यांची माहिती पुन्हा भरणे. ही प्रोसेस करण्यासाठी पुन्हा एकदा कागदपत्रे अपलोड करावी लागणार असून, ही प्रोसेस घरबसल्या करता येणार आहे.
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही केवायसी करु शकतात.
केवायसीमध्ये जाऊन तुम्हाला सर्व कागदपत्रे आणि माहिती टाकायची आहे.
तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड, उत्पन्नाची माहिती, आधार कार्ड माहिती टाकायची आहे.
त्यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होईल.