• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जीएसटी दरकपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग !

भाजपाचे प्रदेश सह-मुख्य प्रवक्ते श्री. अजित माधवराव चव्हाण यांचा विश्वास

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 19, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
जीएसटी दरकपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२५

भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला आहे. जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे सह-मुख्य प्रवक्ते श्री. अजित चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी व सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल, तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. याचा व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल. मागणी व उत्पादन वाढणार असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबांच्या आर्थिक संपन्नतेची नवी सुरुवात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सामान्य माणसाचे जीवनमान सुलभ करणे आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबुती देणे हा जीएसटी करप्रणालीच्या नव्या रचनेचा हेतू असेल, असे पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केले होते. केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी सुधारणांचा नवा प्रस्ताव एकमताने संमत करून पंतप्रधानांच्या संकल्पास बळ दिले आहे, अशा शब्दांत श्री अजित चव्हाण यांनी या बदलाचे स्वागत केले.

सामान्य माणूस, शेतकरी, मध्यम व लघु उद्योगक्षेत्र, मध्यमवर्गीय समाजघटक, महिला आणि युवा वर्गास या सुधारणांमुळे होणाऱ्या नव्या अर्थनितीचा लाभ होईल आणि व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेचा अपूर्व आनंद उपभोगता येईल. देशातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून नवी जीएसटी कररचना तयार करण्यात आल्याने देशात नागरिक केंद्रीत उत्क्रांतीची सुरुवात झाली असून, समाजाच्या अखेरच्या स्तरापर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचे जीवनमान यामुळे उंचावणार आहे. सध्याच्या चार स्तरीय कर रचनेचे सुसूत्रीकरण करून केवळ १८ % आणि ५ % या दोन स्तरांमध्ये नवी जीएसटी करआकारणी होणार असल्याने अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा हलका किंवा नाहीसा होणार आहे, असे ते म्हणाले.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुढे तब्बल ६७ वर्षे, म्हणजे २०१४ पर्यंत देशाच्या आर्थिक वाटचालीचा वेग संथ राहिला होता. या काळात देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न केवळ २.०४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले होते. धोरण लकवा, भ्रष्टाचार आणि महागाई गगनाला भिडली होती, त्यातच कर संकलनाची प्रक्रिया क्लिष्ट होती. अर्थकारणात पारदर्शकताही नव्हती.

यामुळे आर्थिक सुधारणांचा वेग वाढविणे, ही देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची गरज होती. मोदी सरकारने हे ओळखून सुधारणांना बळ देणाऱ्या योजना आखल्या व त्यांच्या अंमलबजावणीवरही लक्ष केंद्रीत केले. एक मजबूत अर्थव्यवस्था असलेला आत्मनिर्भर भारत उभा करण्याचे उद्दिष्ट या सुधारणांमुळे शक्य झाले आहे. जीएसटी करआकारणीचा पहिला टप्पा १ जुलै २०१७ रोजी सुरू झाला, आणि त्याआधी तब्बल १७ वर्षे देशाला अशा कररचनेची केवळ प्रतीक्षा होती. २०१७ मध्ये ती संपुष्टात आली आणि आर्थिक सुधारणांचा वेग झपाट्याने वाढला. त्यामुळेच आज देशातील २५ कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालून बाहेर आली असून देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. ही वाटचाल अधिक वेगवान झाली असून, आता जागतिक पातळीवरील आर्थिक अस्थिरतेच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार असल्याचा निर्वाळा जागतिक वित्तसंस्थांनी दिला आहे, असे ते म्हणाले.

मोदी सरकार विकासाचे राजकारण करणार

राज्यात सरकार कोणाचेही असले तरी जीएसटी दर कपातीमुळे प्रत्येक राज्यातील जनतेला, प्रत्येक कुटुंबाला, गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना, लहान-मोठ्या उद्योजकांना, प्रत्येक व्यापाऱ्याला आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्याची घाणेरडी सवय काँग्रेसला लागली आहे. त्यांचे हीन दर्जाचे राजकारण त्यांना लखलाभ होवो, मोदी सरकार मात्र सर्व वर्गातील जनतेचे भले करण्यासाठी विकासाचे राजकारण करत राहणार, असा विश्वासही श्री अजित चव्हाण यांनी व्यक्त केला.
सदर पत्रकार परिषद ही भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सह-मुख्य प्रवक्ते श्री.अजितजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण विषयावर आयोजित करण्यात आलेली होती. या पत्रकार परिषदेला आ. सुरेश भोळे (राजूमामा), महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर व जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, जिल्हा सरचिटणीस डॉ केतकी ताई पाटील, राजेंद्र सोनवणे, तसेज जिल्हा पदाधिकारी अशोक राठी, दिपक परदेशी,आशिष सपकाळे, GST सहसयोजक चंद्रशेखर अग्रवाल ,मनोज भांडारकर, अमित काळे, यांच्या उपस्थितीत होते

Related Posts

बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

मामा-भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक : ट्रकखाली चिरडल्याने मामाचा मृत्यू !

November 17, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

शिलाई मशीनचे आमिष, ९० महिलांना गंडा : ३ लाख १० हजारांचा अपहार !

November 17, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

भाजीपाला घेऊन घरी परतणाऱ्या तरुणीचा विनयभंग; नागरिकांच्या मध्यस्थीने सुटका!

November 16, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्री तीन बंद घरांना फोडले; सीसीटीव्हीत चोरटे कैद!

November 16, 2026
जळगाव पोलिसांचा रात्रीच्या वेळी दणका : ४९ मद्यपी चालकांसह ५२६ वाहनधारकांवर कारवाई!
क्राईम

जळगाव पोलिसांचा रात्रीच्या वेळी दणका : ४९ मद्यपी चालकांसह ५२६ वाहनधारकांवर कारवाई!

November 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

लाच घेणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी !

November 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

मामा-भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक : ट्रकखाली चिरडल्याने मामाचा मृत्यू !

November 17, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

शिलाई मशीनचे आमिष, ९० महिलांना गंडा : ३ लाख १० हजारांचा अपहार !

November 17, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

भाजीपाला घेऊन घरी परतणाऱ्या तरुणीचा विनयभंग; नागरिकांच्या मध्यस्थीने सुटका!

November 16, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्री तीन बंद घरांना फोडले; सीसीटीव्हीत चोरटे कैद!

November 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group