जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२५
जळगाव शहरातील नेरी नाका येथील मधुदत्त मॅटर्निटी आणि नर्सिंग होम यांच्या वतीने २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र स्पेशल आरोग्य तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. “नारी शक्ती” या उपक्रमांतर्गत आयोजित या विशेष कॅम्पमध्ये महिलांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत.
या कॅम्पमध्ये गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र ANC तपासणी शिबिराचे आयोजन असून, त्यामध्ये रक्ततपासणी, थायरॉईड तपासणी, सोनोग्राफी (फिटल वेलबींग) आणि डॉक्टरांचा सल्ला यांचा समावेश आहे. या तपासणीचे शुल्क फक्त 1000 रुपये इतके आहे, जे मूळ शुल्क 2500 रुपयांच्या तुलनेत अत्यंत सवलतीचे आहे. या तपासण्या डॉ. सौ. श्रद्धा तेजस राणे (MBBS, FCPS, OBS & Gynecologist) यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत.
सर्वसामान्य नागरिकांसाठीही एक स्वतंत्र आरोग्य कॅम्प आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये सीबीसी, उपाशी व जेवणानंतरची साखर तपासणी, ईसीजी, क्रिएटिनिन, लिपिड प्रोफाइल व तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळणार आहे. या तपासणी पॅकेजचे मूळ शुल्क 3000 रुपये असले तरी कॅम्पदरम्यान ते केवळ 1000 रुपये इतक्याच शुल्कात उपलब्ध आहे. या तपासण्या डॉ. तेजस दिलीप राणे (एम.डी. मेडिसिन) यांच्या देखरेखीखाली होणार आहेत.
मधुदत्त मॅटर्निटी आणि नर्सिंग होममध्ये वंध्यत्व उपचार, स्त्रीरोग व प्रसूतीसंबंधित आजारांचे निदान, सुरक्षित ऑपरेशन थिएटर, विविध प्रकारच्या सोनोग्राफी सुविधा, कुडुंब कल्याण शस्त्रक्रिया यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत. तसेच हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, संधिवात, किडनी विकार, फुफ्फुसाचे आजार यांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो.
आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांसाठी कॅशलेस सुविधा देखील उपलब्ध असून NEW INDIA, UNITED INDIA, ORIENTAL, RELIANCE, SBI GENERAL, HEALTH INDIA आदी विमा कंपन्यांचा समावेश आहे.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या कॅम्पमुळे नागरिकांना सुलभ दरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक तपासण्या करून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी किंवा नावनोंदणीसाठी 0257-2239300 किंवा 7249369365 या क्रमांकावर संपर्क साधावा.