
जळगाव मिरर । २७ सप्टेंबर २०२५
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथे तलवार घेवून दहशत माजवणाऱ्या एकास पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या स.पो.नि. कल्याणी वर्मा यांना पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील अर्जुन किसन बंजारा याने गावात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने घरात तलवार ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच त्यांनी हवालदार अतुल पवार, पो. कॉ. शैलेश चव्हाण, पो. कॉ. अमोल पाटील, पो.कॉ. प्रमोद वाडीले यांना पाठवले. त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याला विश्वास घेऊन विचारपूस केली.
त्यावेळी त्याने घरातील कोठीत तलवार ठेवल्याचे सांगितले. दोन पंचासह पो.हे.कॉ. अतुल पवार यांनी अर्जुन बंजारा यांनी तलवार जप्त केली. पाच हजाराची ३२ इंच लांबीची पितळी मुठेची तलवार पोलिसांनी पंचनामा करून जप्त केली. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अर्जुन किसन बंजारा (वय २९) याच्यावर विविध कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास स.पो.नि. कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनात हवालदार अतुल पवार करत आहेत.




















