जळगाव मिरर । ८ ऑक्टोबर २०२५
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असलेल्या पहिल्या टप्प्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे. ते मुंबई मेट्रो लाईन 3 च्या फेज 2बी चे उद्घाटन देखील त्यांनी केले. ही मुंबईची पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन आहे. नवी मुंबई विमानतळावरील टर्मिनल कमळाच्या आकाराच्या डिझाइनमध्ये विकसित करण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये येथून नियमित उड्डाणे सुरू होतील. हे मुंबईचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शेतकरी नेते डी.बी. पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्यात आले आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
मात्र, आता काँग्रेसला हे सांगावे लागेल की, ते कोण होते? ज्यांनी विदेशी दबावांमध्ये निर्णय घेतला. ज्यांनी मुंबई आणि देशाच्या भावनेसोबत खेळ खेळला. देशाला हे जाणून घेण्याचा हक्क देखील आहे. काँग्रेसच्या या कमजोरीमुळे आतंकवाद्यांना मजबूत केले. देशाच्या सुरक्षेला कमजोर केले. याची किंमत देशाला वारंवार चुकवावी लागली आहे. आमच्यासाठी देश आणि देशाची सुरक्षा या व्यतिरिक्त काहीच मोठे नाही. आजचा भारत दमदार प्रत्युत्तर देतो. आजचा भारत घरात घुसून मारतो. हे जगाने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाहिले देखील आहे. याचा सर्वा गर्व देखील असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
2008 मध्ये दहशतवाद्यांनी मुंबई शहर हे मोठा हल्ला करण्यासाठी निवडले. मात्र त्यावेळी काँग्रेसचे सरकार सत्तेमध्ये होते. त्यांनी कमजोरीचा संदेश दिला. दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले असल्याचा संदेश दिला. नुकतेच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने, जे देशाचे गृहमंत्री देखील होते. त्यांनी एका मुलाखतीमध्ये खूप मोठा खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, मुंबई हल्ल्यानंतर भारतीय सैन्य पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी तयार होते. पूर्ण देशाची देखील त्यावेळी हीच इच्छा होती. मात्र त्याच काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, कोणत्या दुसऱ्या देशाच्या दबावामुळे त्यावेळी काँग्रेस सरकारने भारतीय सैनिकांना पाकिस्तानवर हमला करू दिला नाही.
गेल्या अकरा वर्षापासून देशवासीयांचे जीवन सुविधाजनक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच रेल्वे, रस्ते मार्ग, विमानतळ, मेट्रो, इलेक्ट्रिक बस अशा प्रत्येक सुविधांवर अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे. अटल सेतू आणि कोस्टल रोड सारखे प्रकल्प तयार झाले आहेत. वाहतुकीच्या प्रत्येक मार्गाला आपआपसात जोडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
आज मेट्रोलाईनचे लोकार्पण झाले आहे. मात्र, या वेळी मला काही लोकांची आठवण होते. या मेट्रोलाईचे भूमिपूजन देखील मी केले होते. त्यामुळे मुंबईकरांना आशा वाटत होती की, त्यांचे जीवन सुखर होईल. मात्र, मधल्या काळात ज्या लोकांची सत्ता आली. त्यांनी याचे कामच थांबवले. त्यांना सत्ता मिळाली मात्र देशाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता मेट्रो लाईन पूर्ण झाल्यामुळे ज्या प्रवसाला दोन अडीच तासांचा वेळ लागत होता, तो 30 मिनिटांचा झाला आहे. एक -एक मिनिटांचे महत्त्व असलेल्या मुंबईला दोन-तीन वर्षापर्यंत या सुविधा पासून वंचित राहील राहावे लागले. हे कोणत्याही पापापेक्षा कमी नाही.




















