जळगाव मिरर | ८ नोव्हेंबर २०२५
पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे ४ रोजी साजऱ्या होणाऱ्या यात्रोत्सवादरम्यान पारोळ्यातील भटू पाटील यांची दुचाकी चोरीस गेली होती. त्यांनी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणी पारोळा पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, बहादरपुर येथे ४ रोजी श्री बद्रीनाथ महाराजांचा यात्रोत्सव साजरा केला. या यात्रेत पारोळ्यातील ओम नगरमधील भटू विष्णू पाटील (वय ४९) हे दुचाकीने कुटुंबासह गेले होते. तेथून भटू पाटील यांची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (एमएच- १९, बीएफ- ६६७५) चोरट्याने चोरुन नेली होती. या बाबत भटू पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा तपास हवालदार प्रवीण पाटील करत होते.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस तपास करत होते. दरम्यान, पो.नि. अशोक पवार यांना तालुक्यातील वडगाव येथील संदीप नाना भील याने ही दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. त्यांनी तपास पथकातील पो.उ.नि. अमोल दुकळे, हवालदार सुनील हटकर, प्रवीण पाटील, अनिल राठोड, अशिष गायकवड यांना ही सूचना देत कारवाईसाठी पाठवले. त्यांनी संदीप भील यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबूली दिली. त्यानंतर संदीप भील (वय २०) यास अटक करुन त्याच्याकडून ३५ हजारांची दुचाकी हस्तगत केली आहे.



















