जळगाव मिरर | १० नोव्हेंबर २०२५
वाघुर नदीच्या पात्रातील पाण्यात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. दिलीप पाडुरंग मोरे (वय ४१, रा. बेळी, ता. जळगाव) असे मृताचे नाव आहे. गुरुवार दि.६ रोजी सायंकाळी नदीकडे जातो, असे सांगुन दिलीप मोरे हे घराबाहेर पडले होते. बराच वेळपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता तपास लागला नाही.
सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी रोजी कुटुंबातील सदस्य जळगाव येथे शोध घेत असताना त्यांना वाघुर नदीवर तुमचा भाऊ सापडला, असे बेळीचे पोलीस पाटील यांच्याकडून फोनवर सांगण्यात आले. कुटुंबियांनी तत्काळ बेळी येथे नदीवर गेले असता वाघुर नदीच्या पात्रात पाण्यात त्यांना तरुण मृतावस्थेत निदर्शनास आला. हा मृत दिलीप मोरे असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आल्यानंतर ओळख पटली. पोलिसांनी तत्काळ मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला असता तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. उपनिरीक्षक रवींद्र तायडे हे तपास करीत आहेत.



















