जळगाव मिरर । २० नोव्हेंबर २०२५
बोलण्यात गुंतवून ठेवत साधूच्या वेशात असलेल्या दोन जणांनी वृद्धाच्या बोटातील अंगठी काढून घेतली. काही वेळानंतर हा प्रकार वृद्धाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या दोघांचा शोध घेतला. यावेळी त्यांच्याजवळ असलेली अंगठी काढून घेतल्यानंतर जमावाने त्यांना पब्लिक मार दिला. हा प्रकार बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मानराज पार्क सुरु होते. परिसरात घडला. त्या दोघ साधूंना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम सुरु होते.
सविस्तर वृत्त असे की , शहरातील मानराज पार्क परिसरात राहणाऱ्या वृद्धाला रस्त्याने जाणाऱ्या दोन साधूच्या वेशात असलेल्यांनी थांबवले. त्या वृद्धाला बोलण्यात गुंतवून ठेवत त्या दोघ साधूंनी हातचालाखी करीत त्या वृद्धाच्या हातातून सोन्याची अंगठी काढून घेतली. त्यानंतर ते दोघ साधू तेथून निघून गेले, काही वेळानंतर हा प्रकार वृद्धाच्या लक्षात येताच त्यांना बोटातील सोन्याची अंगठी गायब असल्याचे दिसले. त्यांनी लागलीच त्या परिसरात त्या दोघ साधूंचा शोध घेतला. ते साधू भेटल्यानंतर वृद्धाने नागरिकांच्या मदतीने साधूंजवळ असलेली अंगठी परत मिळवली.
वृद्धाच्या बोटातून गायब केलेली अंगठी परत मिळाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या दोघ साधूंना बेदम चोप दिला. हा प्रकार रामानंद नगर पोलिसांना माहिती पडताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पब्लिमार देत असलेल्या नागरिकांच्या तावडीतून त्या साधूंची सुटका करुन घेतली. त्यानंतर दोघांना पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्या दोघ साधूंची कसून चौकशी केल्यानंतर वृद्धाच्या बोटातून अंगठी काढण्यापुर्वी त्या दोघ सांधूना कोणीतरी अर्धा किलो बदाम आणि पाचशे रुपये दक्षणा म्हणून दिल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी त्या दोघांविरुद्ध कारवाई करण्याचे काम सुरु होते





















