जळगाव मिरर । २१ नोव्हेंबर २०२५
धरणगाव तहसील कार्यालयातील लिपिक व एरंडोल येथे राहणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांला भरधाव वेगाने मागाहून येणाऱ्या डंपरने जबर धडक दिल्याने दि. २० रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले असताना त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे एरंडोलसह धरणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, येथील अष्टविनायक कॉलनीतील शिवाजी रघूनाथ महाजन (वय ४२) हे जागीच ठार झाल्याची घटना २० नोव्हेंबरला सकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील बैठक हॉलसमोरील सर्विस रस्त्यावर घड़ली. या हृदयदायक घटनेमुळे शहारात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर घरातीला कर्ता पुरुष अचानक गेल्याने महाजन कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, शिवाजी महाजन हे नित्याप्रमाणे एरंडोल ते पारोळा महामार्गावर आपल्या ओळखीच्या काही लोकांबरोबर मॉर्निंग वॉकसाठी जात. २० नोव्हेंबरला आपल्या दैनंदिन क्रमानुसार ते मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. सकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास महामार्गावरील रघुवीर समर्थक बैठक हॉलसमोरील सर्व्हिस रोडवर शहराकड़े येत असताना मागून भरधाव वेगाने येनाऱ्या डंपर (एचआर- ३८, एडी- ४१३६) ने त्यांना जबर धडक दिली. त्यामुळे डंपरच्या चाकाखाली येऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच हे. कॉ. राजेश पाटील, अमोल भोसले, विजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, घटनेनंतर डंपर चालक वाहन सोडून फार झाला. पोलिसानी डंपर जप्त करून पोलिस ठाण्यात जमा केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, ५ वर्षाचा मुलगा व ११ वर्षाची मुलगी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिवाचे एरंडोल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, ज्या डंपरने धड़क दिली ते डंपर एरंडोल ते धरणगाव रस्त्याच्या कामासाठी मुरुमाची वाहतूक करत असल्याचे घटनास्थळी सांगण्यात आले. तर महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा व चुकीच्या नियोजनामुळे आतापर्यंत महामार्गावर अनेक निष्पापांचे बळी गेल्याची संतप्त भावना व्यक्त केली. या प्रकरणी सुरेश लक्ष्मण पारखे यांच्या फिर्यादीवरुन एरंडोल पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे.कॉ. किरण पाटील करत आहेत.




















