जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२५
खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै.गि.न.चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर , साने गुरुजी कॉलनी , जळगाव या शाळेत भारतीय संविधान व शहीद दिन दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ वार – बुधवार रोजी शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन केल्यानंतर संविधान वाचन करून भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेतील सर्व “हर घर संविधान” विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मुंबई येथे शहीद झालेल्या देशवासीयांना श्रद्धांजली अर्पण केली.शाळेचे मुख्याध्यापक श्री.श्याम ठाकरे सर यांनी विद्यार्थ्यांना संविधान कोणी व कधी कसे तयार केले हे सांगून २६/११/२००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींची माहिती सांगितली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ.पुनम पाटील मॅडम यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.श्याम ठाकरे सर , श्रीमती.जयश्री पाटील , श्री.स्वप्निल भोकरे , सौ.शारदा चौधरी , सौ.पुनम पाटील , सौ.दीपिका सोनवणे , सौ.उज्वला भामरे , सौ.सुनिता पाटील , सौ.मनीषा वाघ , सौ.रोहिणी निकम , सौ.प्रिया कोपरकर , श्री.भूषण अमृतकर या सर्वांनी परिश्रम घेतले.




















