जळगाव मिरर | २७ नोव्हेंबर २०२५
भारतीय संविधान दिनानिमित्त जळगाव शहरातील नवीन कानळदा रोड परिसरात संविधान वाचन आणि संविधान पत्रक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून संविधान दिनाचा संदेश अधिक दृढ केला. हा उपक्रम दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान आयोजित करण्यात आला होता. नित्या फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. निलेश जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सागर चित्रे, माजी नगरसेवक दिलीप पोकळे,
अॅड. निलेश जाधव, विजय सुरवाडे, भारतीताई रंधे, डॉ. स्वप्नजाता मोरे, आनंद सपकाळे, राजू मोरे, शिवम सोनवणे, आकाश मोरे आदी मान्यवरांचा समावेश होता.
यावेळी उपस्थित नागरिकांना संविधान उदेशिकेचे वाचन करण्यात आले तसेच संविधानाचे पत्रक वाटप करून संविधानातील मूल्यांविषयी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात सहकार्य करणाऱ्यांमध्ये हिमांशू हिंगू, महेश जोगी, प्रफुल गायकवाड, मोहित जाधव, हर्षल पाटील, हरीश जोगी, सागर सोनवणे, ललित जाधव, नवल सपकाळे यांचा सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमास वॉर्ड क्रमांक 1 मधील नागरिकांसह जळगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून संविधानाबद्दलची आदरभावना व्यक्त केली.





















