जळगाव मिरर । ३ डिसेंबर २०२५
यावल शहरात तरुणाला बेदम मारहाणीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, जळगावच्या शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील समता नगर येथील तरुण तुषार चंद्रकांत तायडे (वय १८) परिवारासह समता नगर येथे राहत होता. काही महिन्यांपूर्वी त्याचे काही लोकांशी वाद झाले होते. असी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली. दरम्यान तुषार हा मंगळवारी यावल तालुक्यातील वड्डी परसाडे या गावात आजीचे निधन झाले होते. या अंत्यविधीसाठी गेला होता. अंत्यविधी आटोपल्यानंतर तो जळगाव परत येण्यासाठी निघाला तेव्हा त्याला काही तरुणांनी तुषार तायडेला घेरले. जुन्या वादातून त्याला बेदम मारहाण केली. सदर ही घटना संध्याकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान होती. यावल शहर जवळील पाटजवळ तुषार तायडे जखमी अवस्थेत पडलेला दिसला. तेथून त्याला नागरिकांनी यावल ग्रामीण रुग्णालयात आणले होते. यात त्याच्या दोन्ही पायांना जबर मार लागला होता. तुषारने त्याच्या वडिलांना फोन करून काही तरुण त्याला मारहाण करीत असल्याबाबत सांगितले होते. यावल रुग्णालयात मुलाला जखमी अवस्थेत पाहून त्यांनी एकच आक्रोश केला.
प्रथमोपचार करून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना काही वेळातच तुषारचा मृत्यू झाला. प्रसंगी रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. तर जळगावच्या रुग्णालयात देखील पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान तरुणाला मारहाण करणारे संशयित आरोपी मारहाण केल्यानंतर पसार झाले. त्यांचेविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होते. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जुन्या वादातून खून झाल्याने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उमटले आहे.




















