जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२५
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे 9 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय वरिष्ठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे वरिष्ठ गटातील मुलांचा अंतिम संघ जाहीर करण्यात आला आहे.
या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यासाठी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी दि. 2 डिसेंबर 2025 रोजी डॉ. विश्वासराव रंधे क्रीडा संकुल, शिरपूर येथे पार पडली. विविध वजनगटांमधील उमद्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याची चमक दाखवत स्पर्धा गाजवली.
वजनगटानुसार निवड झालेल्या खेळाडूंची यादी :
50–55 कि.ग्रा. : नयन सोनवणे
55–60 कि.ग्रा. : हर्षवर्धन वाघ
60–65 कि.ग्रा. : ओम राजपूत
65–70 कि.ग्रा. : रोहित सोनवणे
70–75 कि.ग्रा. : विशाल मिस्त्री
80–85 कि.ग्रा. : प्रणव खुळे
90+ कि.ग्रा. : अमोल पवार
खेळाडूंच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष तथा धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जिल्हा उपाध्यक्ष कैलास जैन, खजिनदार राजेंद्र बोरसे, लिंबाजी प्रताळे, किशोर पाटील, योगेश पाटील, केव्हीपीएस बॉक्सिंग क्लबचे प्रशिक्षक विजेंद्र जाधव, प्रशिक्षक धीरज पाटील, प्रा. भरत कोळी, तसेच धुळे जिल्हा व नाशिक विभागीय सचिव मयूर बोरसे यांनी खेळाडूंना मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेदरम्यान पंच म्हणून ऋषिकेश अहिरे, सागर कोळी, पूनम उठवाल, दर्शन कोळी यांनी जबाबदारी पार पाडली.
धुळे जिल्हा बॉक्सिंग संघाचा हा संघ राज्य पातळीवर दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




















