जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२५
यावल तालुक्यातील आंबापाणी येथे एक दुर्दैवी घटना घडली असून ४७ वर्षीय महिलेने चुकून फवारणीचे औषध असलेल्या ग्लासातील द्रव पाणी समजून प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला. सायरा मुन्ना पावरा (वय ४७) असे मृत महिलेचे नाव आहे.
घरी असताना नजरचुकीने औषध प्राशन झाल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करत आहेत.




















