जळगाव मिरर । ४ डिसेंबर २०२५
धरणगाव–चोपडा रस्त्यावरील शासकीय आयटीआयजवळ पोलिसांनी सुमारे साडेसात किलो गांजा जप्त केला. सोमवार (दि.3) रोजी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव – चोपडा रस्त्यावरील शासकीय आय टी आय जवळ काल दि. ३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सुमारे साडेसात किलोचा गांजा पकडल्याची घटना घडली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा राहुल गायकवाड यांचे पथक तसेच धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक माळी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील, सुधीर चौधरी, संदीप पाटील, किशोर भोई या पथकाने कारवाई केली. घटनास्थळावरून एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.




















