जळगाव मिरर | ५ डिसेंबर २०२५
राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची धामधूम संपली असून आता निकालाची प्रतीक्षा होत असताना महानगरपालिका निवडणुकीची देखील रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे तर जळगाव शहरात देखील अनेक इच्छुकांनी मनपा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील अनेक नवे चेहरे व तरुण उमेदवारांना संधी मिळत आहे यात प्रभाग क्रमांक 15 मधून मनसेचे शहर अध्यक्ष विनोद शंकर शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे यंदाचे महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या उत्साहात सुरू होणार आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 15 मध्ये गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे विनोद शंकर शिंदे यांनी यंदाच्या महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून जोरदार तयारी सुरू केले आहे. परिसरातील अनेक नागरिकांकडून त्यांना पाठिबा मिळत आहे. त्याच्या उमेदवारी मुळे प्रभागाचे नवनिर्माण होणार अशी देखील अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तरुण उमेदवार व नवा चेहरा…
प्रभाग क्रमांक 15 मध्ये विनोद शंकर शिंदे यांच्याकडे तरुण उमेदवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा चेहरा म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात विनोद शंकर शिंदे यांना दिग्गज पक्षांच्या विरोधात आपल्या विकासाच्या व्हिजनवर नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी आतापासून मोहीम सुरू केली आहे.
मनसेतील दमदार कामगिरी…
मनसे पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत विविध पदावर काम करत आपल्या कार्याची छाप विनोद शंकर शिंदे यांनी विद्यार्थी वर्गावर पाडली आहे तर आता २०२० पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्ष पदावर काम करीत असताना महानगरपालिकेच्या भोंगळ कारभार विरोधात नेहमीच उपोषण आंदोलन करीत नागरिकांचे प्रश्न सोडवले तर जनतेचे देखील लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक 15 मधून विनोद शंकर शिंदे यांच्याकडून नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा उंचावले आहे.
अशाच राजकीय बातम्यासाठी संपर्क करा ८३२९५५४०९४




















