जळगाव मिरर | ५ डिसेंबर २०२५
जळगाव शहरातील नवीन उड्डाणपूल नजीक राधाकृष्ण नगर परिसरातील मुख्य रस्त्यावर सायंकाळी पाच वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला चार चाकी व दुचाकी वाहनांची मोठी रांगच रांग लागली असते त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे यावर आता संबंधित विभागाने कारवाई होणार का याकडे लक्ष लागून आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातून कानळद्याकडे जाणाऱ्या नवीन उड्डाणपूल उतरताच राधाकृष्ण नगर परिसरातील मुख्य रस्त्यावर अनेक चार चाकी व दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात रांगच रांग लागली असते यामुळे या ठिकाणी परिसरातील नागरिक ज्यावेळेस घरी येतात त्यावेळेस त्यांना वाट काढण्यासाठी रस्ता नसतो त्यामुळे या परिसरात अपघात होण्याची दाट शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वाहतूक विभागाने लक्ष देण्याची मागणी
जळगाव वाहतूक शाखेने या परिसरातील मुख्य रस्त्यावर लागणाऱ्या दुचाकी व चार चाकी या ठिकाणी आपल्या विविध कामासाठी आलेले असतात त्यामुळे या ठिकाणाहून ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांना व शहरातील विविध भागात जाणाऱ्या नागरिकांना या दुचाकी व चार चाकी वाहनांचा मोठा त्रास होत आहे भविष्यात या परिसरात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जळगाव वाहतूक शाखेने संबंधित रस्त्याकडे लक्ष देऊन तत्काळ कार्यवाही करावी अशी देखील मागणी नागरिकांकडून होत आहे.




















