जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२५
जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १८/१९ येथे नितीन साहित्य नगर. अमित कॉलनी. आणि कृष्णा नगर. इथे गेल्या पंधरा वर्षापासून कुठल्याही रस्त्याचं किंवा कुठल्याही गटारीचे काम झालेले नाही, महिन्यापूर्वी १८नंबर आता नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक १९ झाला आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे. यांनी पथदिवे आणि साफसफाई व कचरा संकलन याबाबत महानगरपालिकेकडे १८ महिन्यांपूर्वी. मागणी करून कचरा संकलन आणि पथ दिव्यांची मागणी केली होती, ती मागणी महानगरपालिकेने पूर्ण केली होती,
परंतु पंधरा वर्षे सत्ता भोगलेल्या कुठल्याही नगरसेवकाला या गोष्टीची आठवण त्या काळात आली नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल, ते काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं शहरांमध्ये कुठलाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरसेवक नसताना, अनेक प्रकारचे काम आंदोलन आणि निवेदनाद्वारे प्रशासनाची भांडून केली गेली आहेत,
दरम्यान आज महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून वार्ड क्रमांक १८/१९, मध्ये सुप्रीम कॉलनी आणि औद्योगिक वसाहतीचा भाग येतो, या भागांमधील, १) नितीन साहित्य नगर. २) अमित कॉलनी. ३) कृष्णा नगर. ४) पोलीस कॉलनीतील काही भाग ५) खूबचंद नगर. अजून काही भाग, ६) मेन हवे पासून रामदेव बाबा मंदिर. सुप्रीम कॉलनी स्टॉप. ७)सुप्रीम कॉलनी स्टॉप ते सागर अपार्टमेंट पर्यंत रस्ता कच्चा ही बनलेला नाही,
या भागामध्ये २०१७ पासून सागर अपार्टमेंट ते कृष्णा नगर पाटीपर्यंत, रस्त्यावर खडी अंथरून ठेवलेली नाही, रस्त्याचं काम व विकास कामे झालेले नाहीत, म्हणून परत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वार्ड प्रभाग १८ /१९ च्या समस्येचा पाढा वाचला, याप्रसंगी गटारी आणि सफाई संदर्भात उपमहानगरअध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांनी आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सोमवार पर्यंत साफसफाई व गटारी स्वच्छ करणेबाबत ची मोहीम हाती घेऊन पुढील काम मार्गी लावतो असे आश्वासन दिले आहे. यामुळे प्रशासनाला जाग येईल का हा प्रश्न उपस्थित होत आहे,
याप्रसंगी उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे. व उपमहानगर अध्यक्ष ललित शर्मा. शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील.विभाग अध्यक्ष उमेश अठरे. जनहितचे तालुका उपाध्यक्ष विकास पात्रे.निलेश पाटील. साईनाथ भुरीवर. कल्पना कोळी. कॉलनितील रहिवासी महिला वर्ग व मान्यवर. भरपूर प्रमाणात मनसैनिक उपस्थित होते,




















