जळगाव मिरर | १० डिसेंबर २०२५
मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावचे सरपंच तुळशीराम कांबळे व ग्रामपंचायत शिपाई आत्माराम मेहनकार यांनी ग्रामसेवकाच्या सहीचा नमुना ८ चा उतारा काढून दिल्याच्या मोबदल्यात तीन हजारांची लाच मागणाऱ्या यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार दि. ९ रोजी कारवाई केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदार हे काकोडा गावातील रहिवासी असून त्यांची गावात बखळ जागा आहे. ती जागा स्वतःच्या नावावर करुन तेथे शासनाच्या घरकुल योजनेतून घर बांधयाचे होते. त्यामुळे तक्रारदार यांनी सरपंच तुळशीराम कांबळे यांना भेटले. त्यावेळी सरपंच यांनी तक्रारदाराला ग्रामसेवकाच्या सहीचा नमुना नंबर ८ चा उतारा आणून दिला. त्याच्या मोबदल्यात त्यांनी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ग्रामपंचायतमधील शिपाई आत्माराम मेहनकार यांनी पंचासमक्ष ३ हजारांची लाच मागीतली. लाच मागणीला सरपंच कांबळे यांनी प्रोत्साहन दिल्याची खात्री झाल्यानंतर दोघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे




















