जळगाव मिरर | १४ डिसेंबर २०२५
तालुक्यातील बिलखेडा येथे घरापासून काही अंतरावर असलेल्या पोलीस पाटील यांच्या शेतात प्रवीण प्रल्हाद सोनवणे (वय २५) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. पोलीस पाटील हे मका काढण्याकरीता शेतात गेले असता, त्यांना तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर शनिवार दि. १३ रोजी दुपारी साडेतीन वाजता घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील बिलखेडा येथे प्रवीण सोनवणे हा तरुण वास्तव्यास होता. शेतात मजूरीसह वाहन चालवून तो कुटुंबाला हातभार लावित होता. प्रवीण यांच्या घरापासून काही अंतरावर गावातील पोलीस पाटील मुकुंदा पाटील यांचे शेत आहे. त्या शेतात प्रवीण याने झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. दुपारच्या सुमारास पोलीस पाटील हे मका काढण्याकरीता शेतात गेले असता, त्याठिकाणी प्रवीण हा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून ाला. त्यांनी घटनेची माहिती लागलीच एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत प्रवीणला मयत घोषीत केले.
गेल्या काही दिवसांपासून प्रवीणच्या आईला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार घेतल्यानंतर बरे वाटू लागल्याने त्या घरी गेल्या. परंतू त्यानंतर काही वेळात प्रवीणने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. लाच्या पश्चात आई, पील, मोठा भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. प्रवीणचा स्वभाव मनमिळावू होता. गावात शेत मजूरी, वाहन चालकासह मिळेल ते काम करन कुटुंबाला हातभार लावित होता. घरातील कत्यां मुलाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे गावात हा व्यक्त केली जात आहे. तसेच त्याच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या मित्रांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.




















