जळगाव मिरर । १५ डिसेंबर २०२५
शहरापासून नजीक असलेल्या निमखेडी येथे राहणाऱ्या सागर साहेबराव सोनवणे या तरुणाच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करत त्याचा निर्घण खून केल्याची घटना आज दि.१४ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या खून प्रकरणी तालुका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा शोध सुरु आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील निमखेडी येथे सागर सोनवणे हा तरुण वास्तव्यास होता. रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केले आणि त्याला जखमी अवस्थेत निमखेडी गावात फेकून दिले होते. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत सागरला मयत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.




















