• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

सोशल मीडियाचे आकर्षण पडले महागात; अल्पवयीन मुली थेट राजस्थानात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 15, 2025
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
सोशल मीडियाचे आकर्षण पडले महागात; अल्पवयीन मुली थेट राजस्थानात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२५ 

सोशल मीडियावरील ओळखीचे प्रेमात रूपांतर होऊन पुण्यातील दोन अल्पवयीन मुली थेट राजस्थानात पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काळेपडळ पोलिसांनी तातडीची कारवाई करत तब्बल ३३०० किलोमीटरचा पाठलाग करून दोन्ही मुलींना सुखरूपपणे पुण्यात परत आणले. या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करून त्यांच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ व १६ वर्षांच्या या दोन्ही मुली परस्पर मैत्रिणी आहेत. त्यापैकी एका मुलीची इंस्टाग्रामद्वारे राजस्थानातील सुरेशकुमार वडदाराम प्रजापती (वय २१) याच्याशी ओळख झाली. महिनाभर संवाद झाल्यानंतर आरोपीने तिला प्रेमजाळ्यात अडकवत राजस्थानातील आपल्या गावात येण्याचे आमंत्रण दिले. ही बाब तिने मैत्रिणीला सांगितल्यानंतर तीही सोबत जाण्यास तयार झाली.

दि. २८ नोव्हेंबर रोजी दोन्ही मुली घरच्यांना कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. त्या आधी मुंबईत पोहोचल्या व तेथून राजस्थानकडे रवाना झाल्या. रात्रीपर्यंत मुली घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर दि. २९ नोव्हेंबर रोजी काळेपडळ पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आली. मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे युनिट-५ देखील तपासात सहभागी झाले.  तांत्रिक तपासातून मोबाइल व सोशल मीडिया हालचालींचे विश्लेषण केल्यानंतर मुली राजस्थानात असल्याचे स्पष्ट झाले. सहायक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे व पथकाने वापी, सुरत, अहमदाबाद, फालना, शिवगंज, राणी, पाली व जोधपूर या ठिकाणी शोध घेत तब्बल ३३०० किलोमीटरचा प्रवास केला.

राजस्थानातील राणी परिसरात एक मुलगी आरोपी सुरेशकुमार प्रजापतीसोबत आढळून आली. चौकशीत त्याने मुलीला राजस्थानात बोलावल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्याचा मित्र सुरेशकुमार मोहनलाल राणीभील (वय ३१) याच्याशी दुसऱ्या मुलीची ओळख करून दिल्याचे व ते दोघे पाली येथे गेल्याचे उघड झाले. पोलिसांनी पाली येथे जाऊन दुसऱ्या आरोपीसह दुसऱ्या मुलीलाही ताब्यात घेतले.

राजस्थानात पोहोचल्यानंतर दोन्ही मुलींना आपल्या चुकीची जाणीव झाल्याचे पोलिसांनी सांगितले. काळेपडळ पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Related Posts

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!
जळगाव

विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!

September 5, 2026
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव
जळगाव

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

September 5, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group