दांडेकर व वाघ परिवाराने केले आयोजन ; भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभागाचे आवाहन !
जळगाव मिरर । १६ डिसेंबर २०२५
श्री कूलस्वामिनी कृपेने व स्व.नथ्थु दांडकेर व यशोदाबाई नथ्थु दांडेकर यांचे पुण्यस्मरणार्थ भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा शुक्रवार, दि. १७ डिसेंबर २०२५ ते रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे.
या ज्ञानयज्ञात ह.भ.प. श्रीराम महाराज हे कथाकार म्हणून उपस्थित राहणार असून सकाळी काकड आरती व हरिपाठ, दुपारी श्रीमद् भागवत कथा तर रात्री हरिनाम कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध नामवंत कीर्तनकार व महाराजांची कीर्तने या सप्ताहात होणार आहेत. दि. १७ डिसेंबर रोजी दिंडी सोहळा, तर दि. २८ डिसेंबर रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन इंद्रप्रस्थ नगर, दांडेकर मामा यांच्या घराजवळ, जळगाव येथे करण्यात आले असून सर्व भाविक भक्तांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पांडुरंग कृपेने तसेच संत तुकाराम महाराज व संत सेना महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हा सप्ताह संपन्न होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ. संगीता प्रल्हाद दांडेकर, शिवाजी वाघ व रामकृष्ण दांडेकर यांच्या वतीने करण्यात आले असून, संपूर्ण दांडेकर व वाघ परिवार या आयोजनात सहभागी आहे. या धार्मिक उपक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




















