जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२५
अकोला येथे दि.17 ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडलेल्या 14 वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ.विजयराव व्ही.रंधे इंग्लिश मीडियम स्कूल व के.व्ही.पी.एस.बॉक्सिंग क्लब, शिरपूरचा विद्यार्थी नैतिक दिवान माळी याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक (Bronze Medal) पटकावले.
डॉ. विजयराव व्ही. रंधे इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रतिनिधित्व करताना नैतिक माळीने कठोर मेहनत, अचूक कौशल्य व प्रबळ जिद्दीच्या जोरावर प्रभावी लढती खेळत हे यश संपादन केले.
या यशामागे शाळेचे क्रीडा प्रमुख प्रमोद पाटील,संस्थेचे बॉक्सिंग प्रशिक्षक व क्रीडा शिक्षक विजेंद्र जाधव सर,तसेच स्वप्निल पाटील, समाधान राजपूत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे व किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषारजी रंधे,सचिव नानासो निशांतजी रंधे, खजिनदार सौ.आशाताई रंधे, विश्वस्त रोहित बाबा रंधे,प्राचार्य कामिनी पाटील मॅडम,सारिका ततार मॅडम, क्रीडा संचालक डॉ. एल.के.प्रताळे,संस्थेचे क्रीडा प्रमुख प्रा.राकेश बोरसे,नाशिक विभाग बॉक्सिंग सचिव मयूर बोरसे तसेच सर्व शिक्षकवृंद, सहकारी व क्रीडाप्रेमींनी नैतिक माळीचे अभिनंदन करून त्याच्या भावी क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





















