• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव मनपा निवडणूक : भाजपमध्ये उमेदवारीची रणधुमाळी; निष्ठावंत नाराज, आयातांना संधी ? बंडखोरीच्या हालचाली वाढल्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 20, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगाव मनपा निवडणूक : भाजपमध्ये उमेदवारीची रणधुमाळी; निष्ठावंत नाराज, आयातांना संधी ? बंडखोरीच्या हालचाली वाढल्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | संदीप महाले 

जळगाव महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. ‘निष्ठावंत विरुद्ध आयात’ असा नवा अंतर्गत संघर्ष उभा ठाकल्याने पक्षातील वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. नुकत्याच पार पडलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये तब्बल पाचशेच्यावर इच्छुकांनी हजेरी लावली असून, अजूनही अनेक जण रांगेत असल्याची माहिती आहे.

गेल्या काही महिन्यांत उद्धव सेनेसह इतर पक्षांतील अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी महापौर नितीन लढ्ढा, जयश्री महाजन, सुनील महाजन आणि प्रशांत नाईक या माजी नगरसेवकांच्या आगमनामुळे पक्षाची ताकद वाढली असली, तरी मूळ व वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.  यावेळच्या निवडणुकीत आजी-माजी आमदार व नगरसेवकांच्या नातेवाइकांनीही उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केल्याचे चित्र आहे. ‘घराणेशाहीला थारा देणार नाही’ असा दावा करणाऱ्या पक्षांकडून नेत्यांच्या मुलांना किंवा पत्नींना तिकीट मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निष्ठावंत कार्यकर्ते करू शकतात बंडखोरी

जर उमेदवारीत घराणेशाहीला प्राधान्य देण्यात आले, तर अनेक निष्ठावंत कार्यकर्ते बंडखोरी किंवा पक्षांतराच्या पवित्र्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपची अंतिम उमेदवार यादी जाहीर होताना निष्ठावंतांना न्याय मिळतो की केवळ ‘निवडून येण्याची क्षमता’ पाहून बाहेरून आलेल्यांना झुकते माप दिले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, राजकीय साठमारी सुरू असतानाच सर्वसामान्य जळगावकर मात्र आजही मूलभूत समस्यांच्या विळख्यात अडकलेले आहेत. शहरातील खड्डेमय रस्ते, अर्धवट ड्रेनेजची कामे आणि कायमस्वरूपी वाहतूक कोंडी या प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त आहेत. निवडणूक जाहीर झाली की आश्वासनांची खैरात होते; मात्र निकालानंतर हे प्रश्न पुन्हा ‘जैसे थे’ राहतात, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

आ.भोळे कार्यकर्ते नाराज 

मनपा निवडणुकीसाठी आ.मंगेश चव्हाण यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे तर आ. सुरेश भोळे यांना निवडणूक प्रचार प्रमुखांची जबाबदारी दिल्याने आता भाजप अंतर्गत दोन गट निर्माण झाल्याचे दिसत असून यात आ. भोळे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

Related Posts

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ
क्राईम

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026
‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’
जळगाव ग्रामीण

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026
खेळता-खेळता काळाचा घाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू !
क्राईम

खेळता-खेळता काळाचा घाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू !

June 29, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026
‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group