श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व प्रज्ञावंत फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२५
देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती व खान्देशच्या कन्या आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रिमो स्व. दादा सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण व स्व. रविनाना ठाकरे यांच्या स्मरणार्थ, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व प्रज्ञावंत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम शुक्रवार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हिंदूसूर्य महाराणा प्रताप स्मारक चौक, प्रभात चौक, जळगाव येथे उत्साहात पार पडला.
या सामाजिक उपक्रमात तब्बल ९१ रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरणीय प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधले. रक्तदानातून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.
कार्यक्रमास आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा), ॲड. देवेंद्रसिंह जाधव, माजी नगरसेवक अतुलसिंह हाडा, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रविणसिंह पाटील, संग्रामसिंह सूर्यवंशी, नगरसेवक भरतसिंह पाटील, प्रज्ञावंत फाउंडेशनचे संचालक प्रविण सपकाळे, डॉ. शेषराव परमार, प्रा. डॉ. विश्वजित सिसोदिया, दिलीपसिंह पाटील, भगवान खंडाळकर, विलाससिंह पाटील, विठ्ठलसिंह मोरे, किरण राजपूत, आरोग्य धनसंपदा फाउंडेशनचे जितेंद्र पाटील, विजयसिंह राजपूत, विक्रमसिहं राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमांचे कौतुक केले. युवकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेतल्याने शिबिर यशस्वी ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन सूर्यवंशी, रवी पाटील, अशोक राजपूत, विलाससिंह राजपूत, आशिष राजपूत, अभिजित राजपूत, वैभव मोरे, अजय जाधव, ऋषिकेश पाटील, रोशन राजपूत, विकास राजपूत, वैभव जाधव, विशाल देशमुख, आशिष हाडा, मंगलसिंह जाधव, यशवंत भोई यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. हा उपक्रम सामाजिक जाणीव आणि मानवतेचा संदेश देणारा ठरला असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.





















